“संजय राऊतांची नुसतीच स्टंटबाजी; एकतरी पुरावा दिला का?”;किरीट सोमय्यांचा पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आज आरोप केला आहे. त्यांच्या आरोपांवर सोमय्या यांनी पलटवार केला आहे. “राऊतांची नुसतीच स्टंटबाजी बाजी चालली आहे. त्यांनी केलेल्या आरोपाबद्दल एक तरी पुरावा दिले आहेत का? त्याच्याकडे पुरावेच नाहीत. महाराष्ट्रातला माफिया सेनेने लुटले आहे. राऊत कोव्हीड सेंटरच्या घोटाळ्याबाबत का बोलले नाहीत? राऊतांना एवढंच चॅलेंज करतो कि काय मागे लावायचे ते लावा, मी तयार आहे, अशा शब्दात सोमय्यांनी राऊतांवर पलटवार केला.

राऊतांच्या आरोपानंतर किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, संजय राऊत यांच्याकडून जे आरोप केले जात आहेत. त्या आरोपाबद्दल राऊत यांनी एक ही पुरावा दिलाय का? राऊतांकडून नुसते स्टंट करण्याचे काम केले जात आहेत. वास्तविक पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ईओडब्ल्यू आणि काय लावायचे मागे ते लावा. माझी पुढची भूमिका हि आता कोव्हीडची हत्या करणारे संजय राऊत यांचे सहकारी व बेनामी कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे, असे सोमय्या यांनी म्हंटले.

काय केले आहेत राऊतांनी आरोप ?

पवई पेरु बाग प्रकल्पाच्या अंतिम यादीवर त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली. 433 लोकांकडून 25 लाख रुपये घेण्यात आले. हा 200 ते 300 कोटींचे प्रकरण आहे. ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखा यांना ही कागदे दाखवत आहोत. किरीट सोमय्या सांगायचे की देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर 50 कोटी उकळले. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर किरीट सोमय्यांनी घेतले. हा घोटाळा 400 कोटींचा असल्याची आम्हाला शंका आहे, असे राऊत यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment