हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांनो राज्यातील विरोधी पक्ष सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांचा काठी म्हणून वापर करतात आणि सत्तेत आल्यानंतर तीच काठी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या पाठीत घालतात असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला. याबाबत त्यांनी खोचक ट्विट केलं आहे. राज्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच शेट्टींनी केलेले हे ट्विट चर्चेत आलं आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचे पाहून समाधान वाटले, पण हेच विरोधी पक्ष जेव्हा सत्तेत होते तेव्हा भूमीअधिग्रहण दोन टप्प्यातील एफआरपी यासारखे शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवणारी निर्णय घेताना यांच्यातील शेतकरी प्रेम विधीमंडळाच्या कोणत्या खुंटीला टांगले होते? तेव्हा आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षात असताना या प्रश्नावर सभागृहात गोंधळ घातला आणि सत्तेत आल्यावर निर्णय घेण्याची वेळ आल्यानंतर मूग गिळून गप्प का आहेत? शेतकऱ्यांनो राज्यातील विरोधी पक्ष सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांचा काठी म्हणून वापर करतात आणि सत्तेत आल्यानंतर तीच काठी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या पाठीत घालतात.
सत्तेत आल्यानंतर तीच काठी पहिल्यांदा शेतक-यांच्या पाठीत….!@ANI @SakalMediaNews @lokmat @LoksattaLive @pudharionline @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews @IndianExpress @timesofindia @epunyanagari pic.twitter.com/mS5QzXyzVy
— Raju Shetti (@rajushetti) March 1, 2023
शेतकरी मित्रानो, शेतीशी निगडित कोणतीही माहिती मिळवण्यासाठी आजच Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, हवामान अंदाज, रोजचा बाजारभाव यांसारख्या सुविधा अगदी मोफत मध्ये मिळत आहेत. तसेच हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आसपासच्या रोपवाटिका, कृषी केंद्रे, खत दुकानदार यांच्याशी संपर्क सुद्धा साधू शकता. शेतकऱ्यांचे जीवन अगदी सुखकर व्हावं आणि त्याच्या पैशाची आणि वेळेची बचत व्हावी या उद्देशाने बनवलेले हॅलो कृषी अँप गुगल प्ले स्टोअर वरून आजच डाउनलोड करा आणि 1 रुपयाही खर्च न करता सर्व सुविधांचा लाभ घ्या
हॅलो कृषी डाउनलोड करण्यासाठी Click Here
दरम्यान, राज्यातील कांदा प्रश्नावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. सभागृहाचे कामकाज सुरु होण्याआधी विरोधकांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर कांद्याच्या माळा गळ्यात घालून निदर्शने केल्याचे आपण पाहिले आहे. विरोधकांच्या आक्रमक पावित्र्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादकांना आवश्यक ती मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. नाफेड मधून कांदा खरेदी सुरु असल्याचे शिंदेनी सांगितलं.