Wednesday, February 8, 2023

राज्यसभेत रंजन गोगोई यांच्या विरोधात घोषणाबाजी; विरोधकांचा सभात्याग

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी गुरुवारी राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोगोई यांना राज्यसभेवर खासदार म्हणून उमेदवारी दिली होती. गोगोई यांनी शपथ घेतेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, कायदामंत्री रविशंकर प्रसाद आणि इतर मंत्री व खासदार सभागृहात उपस्थित होते.

मात्र, गोगोई यांच्या शपथविधी दरम्यान विरोधकांनी ‘डील’ ची घोषणा केली आणि आरडाओरडा करत सभागृहाचा त्याग केला. या संपूर्ण प्रकारावर गोगोई यांना प्रश्न विचारला असता, मला यावर भाष्य करण्याची इच्छा नाही. तसेच विरोधक त्यांचे लवकरच स्वागत करतील अशी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

राज्यसभेत उपस्थित कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सभागृहात झालेल्या गदारोळानंतर विरोधी पक्षाच्या वर्तवणुकीवर टीका केली. ते म्हणाले की, याआधीही अनेक न्यायाधीशांनी या सभागृहाची शोभा वाढवली ​​आहे, परंतु अशा प्रकारे विरोधकांनी गोगोई यांना विरोध करणे लज्जास्पद आहे.

रविशंकर प्रसाद म्हणाले, ‘राज्यसभेत विविध क्षेत्रातून आलेल्या अनेक नामांकित व्यक्तींची उत्तम परंपरा आहे ज्यात माजी सरन्याधीशांचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळं रंजन गोगोई नक्कीच त्यांचे उत्कृष्ट योगदान देतील. शपथविधी सोहळ्यादरम्यान विरोधकांच्या सभात्यागावर प्रसाद म्हणाले, “विरोधकांनी सभात्याग करणे हा अनुचित प्रकार होता.”

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.