‘पवार आणि पडळकर त्यांचं ते बघून घेतील’; उदयनराजेंची तिरकस प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । भाजप नेते गोपीचंद पडळकर मला विचारून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलले नाहीत. माझं मत मी परखडपणे मांडत असतो. पवार आणि पडळकर त्यांचं ते बघून घेतील, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. उदयनराजे यांनी बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन सदिच्छा भेट घेतली. यांनतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे भोसले यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

यावेळी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिकेवर उदयनराजे यांना प्रश्न केला असता त्यांनी त्यांच्या खास तिरकस शैलीत आपली प्रतिक्रिया दिली. उदयनराजे म्हणाले कि, ”कोणी कोणाबद्दल काय बोलले हे ते मला विचारून बोलले नाहीत. माझं मत मी परखडपणे मांडत असतो. शरद पवार आणि पडळकर त्यांचे ते बघून घेतील, असं उदयनराजे म्हणाले.

याशिवाय ‘ज्यांनी कुणी टीका केली. त्याबद्दल त्यांनाच विचारलं पाहिजे. कोण काय बोलतो याच्याशी मला घेणं नाही. कुणी मला विचारून बोलत नाही आणि मला विचारूनही कोणीही उत्तर देणार नाहीत. माझी मतं मी परखडपणे मांडत असतो, असल्या गोष्टीत आपण पडत नाही, असंही उदयनराजे यावेळी म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.” 

Leave a Comment