छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेणार भेट; ‘या’ दिवशी करणार ‘आरक्षण पे चर्चा’

मुंबई । राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले येत्या 2 डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी ही भेट असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाणही उपस्थित असणार आहेत.

आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी 2 डिसेंबरला खासदार संभाजीराजे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. ही भेट नेमकी कुठे होईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली आहे. मात्र या बैठकीत मराठा आरक्षणाचे मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला अशोक चव्हाण उपस्थित असतील.

सर्वोच्च न्यायालयात 9 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. नोकरी आणि शैक्षणिक आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला होता. SEBC प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळं आरक्षणाचा मुद्दा आणखी चिघळला आहे. (MP Chhatrapati Sambhaji Raje Bhosale Meet CM Uddhav Thackeray)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like