फडणवीसांना मुख्यमंत्री करा! ३ महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची, नितेश राणेंचा दावा

मुंबई । “इतरांच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे शंभर मार्ग आहेत. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलंत तर तीन महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची,” असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नितेश राणे यांनी राज्य सरकारला चांगलंच फैलावर घेतलं. त्यांनी ठाकरे सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नसल्याचा आरोप केला.

मराठा आरक्षण देण्याची राज्य सरकारची इच्छाशक्ती नाही. खासदार उदयनराजे यांच्याप्रमाणे मीही सांगतो. लवकरात लवकर तुम्ही जर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवलंत तर तीन महिन्यात आरक्षण देण्याची जबाबदारी आमची,” असं नितेश राणे म्हणाले. तसेच, यावेळी त्यांनी राज्य सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नाही, असा आरोपही ठाकरे सरकारवर केला.

देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं तर तीन महिन्यांत आम्ही मराठा समजाला टिकेल असं आरक्षण देऊ असा दावा केला. तसेच, हे चोरांचं सरकार आहे. महाविकास आघाडीला मराठा समाजाला त्रास द्यायचा आहे असे म्हणत प्रामाणिकपणे आरक्षण पाहिजे असेल तर देवेंद्र फडणवीस यांना मुंख्यमंत्री करणे ही एकच अट असल्याचंही ते म्हणाले. (Nitesh Rane said that make Devendra Fadnavis CM of Maharashtra for Maratha Reservation)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like