Sunday, March 26, 2023

 दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे ; जयंत पाटलांचे राणेंना चोख प्रत्युत्तर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले नसते तर, जयंत पाटील भाजपमध्ये आले असते. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची याबाबत बोलणीही झाली होती. असा गौप्यस्फोट भाजप नेते नारायण राणे यांनी केला होता. इस्लामपुरात जाऊन हे सर्व मी उघड करणार आहे,’ अस नारायण राणे म्हणाले होते.त्यांच्या या विधानाला मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्ट द्वारे प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले जयंत पाटील-

- Advertisement -

राणे साहेबांची भाजपच्या वरीष्ठ नेत्यात गणती होत नाही हे जाणून खेद झाला. भाजपच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी माझी कधी, कुठे चर्चा झाली याचा तपशील मला कळला तर माझ्या ज्ञानात भर पडेल.

माझ्या पुरते सांगायचे झाले तर माझी भाजपच्या कोणत्याही वरीष्ठ नेत्याशी भाजपमध्ये जाण्याबाबत चर्चा झाली नाही म्हणून हा खुलासा. मी शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता असल्याने असा विचार माझ्या मनात कधीच शिवत नाही. त्यामुळे मागील ५ वर्षे सरकारच्या विरोधात विधीमंडळात लढत होतो.

दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे. आलेली सत्ता जाते व ती पुन्हा मिळवता येते ही पवार साहेबांची शिकवण आहे. त्यामुळे सत्ता हा विषय माझ्यासाठी गौण आहे. अस जयंत पाटील यांनी म्हंटल आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’