शेतकरी मागे हटणार नाहीत, त्यांना शाहीनबाग सारखी वागणूक देऊ नका: राकेश टिकैत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : केंद्राने घेतलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात मागील अनेक महिन्यांपासून दिल्ली इथं शेतकरी आंदोलन सुरूच आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी संघटना अद्यापही दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदे परत घेण्यास बसून आहेत. “नवे कृषी कायदे जेव्हा मागे घेतले जातील तेव्हाच आंदोलक आपल्या घरी जातील. सरकारनं शेतकरी आंदोलनाला शाहीन बाग सारखी वागणूक देऊ नये असं शेतकरी नेते टिकैत यांनी म्हटले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत शेतकरी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. अनेकदा शेतकऱ्यांनी सरकारशी चर्चा केल्या मात्र अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही. याबाबत पत्रकारांशी बोलताना शेतकरी नेते टिकैत म्हणाले, सरकारने शेतकरी आंदोलनाला शाहीन बाग सारखी वागणूक देऊ नये जसं की गेल्या वर्षी दिल्लीच्या शाहीन बाग मध्ये विरोधादरम्यान करण्यात आलं होतं” असे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टीकेत यांनी म्हटले आहे.

तर आंदोलन 2023 पर्यंत जारी राहिल

जोपर्यंत कृषी कायदे मागे घेतले जात नाहीत आणि एमएसपी वर कायदा तयार केला जात नाही तोवर आंदोलक शेतकरी आपलं आंदोलन स्थगित करणार नाहीत. सर्व शेतकरी सीमेवर बसून राहतील सरकारने कोणत्याही चुकीच्या समजुतीत तर राहू नये आणि त्यांचे आंदोलन दीर्घ कालावधीसाठी चालणार आहे. गरज भासल्यास हे आंदोलन 2023 पर्यंत जारी राहील असं टिकैत म्हणालेत. तसेच नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे फक्त नुकसान होईल असा दावाही त्यांनी केला.

जरी लॉकडाऊन लावण्यात आला तरीदेखील शेतकरी आपल्या जागेवरून हलणार नाहीत कृषी कायदे मागे घेत नाहीत तोवर आंदोलन सुरूच राहणार. देशात आपात्कालीन कर्फ्यु लावण्यात आला किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर शेतकरी मागे हटणार नाहीत. हे आंदोलन दीर्घकाळासाठी चालेल असं टीकेत यांनी स्पष्ट केलंय.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment