ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्याची धमक फक्त महाविकास आघाडीमध्येच : अजित पवार

भाजपवर हल्लाबोल : पंढरपुरात पांडूरंगाला साकडं म्हणाले, राज्यावर आलेलं कोरोनाचं संकट दूर कर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आज भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. यावेळी आयोजित प्रचार सभेपूर्वी उपमुख्यमंत्री यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले. “हे पांडुरंगा राज्यावर आलेलं कोरोनाचं संकट दूर कर” असं म्हणत अजित पवारांनी पांडुरंगाला साकडे घातले. “कोरोना राज्यात वाढलाय. त्यासाठी नियम पाळावे लागतायत. कोरोना नियंत्रणसाठी केंद्राने लस द्यायला पाहिजे. जनतेने आमच्यावर प्रेम केले म्हणून तीस वर्षे राजकारणात आहोत. भाजप हा ग्रामीण भागात फारसा लोकप्रिय नाही. अजून काही प्रश्न सोडवायचे आहेत, हे प्रश्न सोडवण्याची धमक फक्त महाविकास आघाडीत आहे. असा भाजपवर हल्लाबोल करीत काळानुरुप नवीन लोकांना संधी द्यावी लागते” असंही अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून दोन दिवस पंढरपुर दौऱ्यावर आहेत. आज भाजप नेते कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादी प्रवेश तर आज दिवसभर पंढरपुर पोटनिवडणुकीसाठी भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ भरगच्च सभा आयोजित करण्यात आल्या असून त्यास ते हजेरी लावत आहेत. यावेळी आयोजित प्रचार सभेत पवारांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार यांचा प्रचार केला. यावेळी भाषण करताना अजित पवारांना “मास्क काढा” असं लिहिलेली चिठ्ठी आली. त्यावर अजितदादांनी “मी जनतेला सांगतो मास्क वापरा आणि हा शहाणा सांगतो मास्क काढा” असं मिश्कील भाष्य केलं. तसेच ते पुढे म्हणाले, “पाच वर्षांसाठी इथल्या जनतेने भारत नानांना (दिवंगत आमदार भारत भालके) निवडून दिले होते, त्यांचं काम पण सुरु होतं, मात्र काळाने घाला घातला. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील नागरिकांनी भगीरथ भालकेला विधानसभेत पाठवायचे आहे. भगीरथ भालके यांनी भारत नानांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करावे, राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सर्व ताकद लावीन.

“लोकांना लॉकडाऊन नको आहे. शेवटी माणसंही जगली पाहिजेत. 18 वर्षांच्या पुढील लोकांना लस द्या. परदेशात लस पाठवण्याच्या आधी आपल्या देशात लस द्या. स्वतःचं पोट उपाशी ठेवून शेजाऱ्याला लस दिले जाते. आपल्याकडे यंत्रणा आहे. सीरमवर केंद्राचं कंट्रोल आहे, नाहीतर आम्ही सीरमला लस द्यायला सांगितलं असतं. मात्र राजकारण केले जाते.” असंही अजित पवार म्हणाले.

You might also like