राम गोपाल वर्मा यांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; अभिनेत्रीसोबत करत होते…

Ram Gopal Verma
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी अनेक तरुणी प्रयत्न करत असतात. त्यातल्या त्यात दिग्गज अशा दिग्दर्शकांच्या चित्रपटात काम मिळावे म्हणून त्यांची मनधरणी करताना दिसतात. मात्र, काही दिगदर्शकही अभिनेत्रींना चित्रपटात काम देतात पण ते एखाद्या गोष्टीमुळे चांगलेच चर्चेत येतात. अशाच एका फोटो आणि व्हिडीओमुळे दिगदर्शक राम गोपाल वर्मा चांगलेच चर्चेत आले आहेत.

दिगदर्शक राम गोपाल वर्मा यांचा “खतरा डेंजरस” हा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये मोठ्या प्रमाणात रोमँटिक सीन्स बघायला मिळणार आहेत. “खतरा डेंजरस” मध्ये अभिनेत्री आशु रेड्डी हिच्या पायाचा राम गोपाल वर्मा हे मसाज करत असल्याचा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे.

https://www.instagram.com/p/Cl3H24Lp1Io/

राम गोपाल वर्मा हे नेहमीच आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काहीही करतात. याचाच हा एक भाग असून चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे अभिनेत्री आशु रेड्डीच्या पायाचा मसाज करत आहेत.

https://www.instagram.com/p/Cl1KY3kJr8x/

अभिनेत्री आशु रेड्डी हिने हा फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर असून या फोटोवर चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणात कमेंट केली आहे. राम गोपाल वर्मा या फोटोच्या माध्यमातून आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत असल्याचे दिसत असून हा चित्रपट 9 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.