अयोध्या निकाल तथ्यावर नव्हे तर भावनांवर देण्यात आला- प्रकाश आंबेडकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अयोध्या निकाल तथ्यावर नव्हे तर भावनांवर देण्यात आल्याची टीका बहुजन वचिंत आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलीय. पुरावे आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर होते. वैदिक धर्म मानणारे लोक हे दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण करीत असल्याचा प्रकार आयोध्येत होत असल्याचे आंबेडकर म्हणाले. झी २४ तास वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिलं आहे.

अयोध्या ही बौद्ध सांस्कृतिक तसेच बौद्धांचे ज्ञानाचे केंद्र होते. अलाहाबाद म्हणजे प्रयागराज उच्च न्यायालयात प्रकरण गेले तेव्हा हा निकाल तथ्यांवर नाही तर भावनांवर म्हणजे राम मंदिराच्या बाजूने लागल्याचे आंबेडकर म्हणाले. सर्वोच्च न्यायालयातही इतिहास आणि पुराव्यांना ग्राहय धरले नसल्याचे ते म्हणाले. अयोध्या ही पूर्वी साकेत नावाने ओळखली जात होती. या ठिकाणी केलेल्या खोदकामात जे सापडले ते बौद्ध अवशेष आहे हे अलाहाबाद न्यायालयाने हे मान्य करायला हवे होते. मात्र तसे घडले नाही.

सद्य परिस्थिती पाहता राम मंदिर निर्माण करण्याची गरज असून आम्ही राम मंदिराच्या बाजूने निकाल देतो, असे स्पष्ट न्यायालयाने सांगायला हवे होते. असे झाले असते तर भारतीयांकडे कोणी संशयित नजरेने पाहीले नसते असे ते म्हणाले. कारण भारतीय आता आपल्याशी खरे बोलायला लागले आहे, असा निकाल त्या ठिकाणी लागला असता. मात्र, आताचा निकाल पाहता आजही भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जाईल, असेही शेवटी प्रकाश आंबेडकर म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”