रामानंद सागर यांचे ‘रामायण’ पुन्हा एकदा टीव्हीवर होणार प्रसारित,प्रकाश जावडेकर यांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । रामानंद सागर यांची दूरदर्शनवरील मालिका ‘रामायण’ पुन्हा एकदा टीव्हीवर प्रसारित होणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी २७ मार्च रोजी सकाळी याबाबत माहिती दिली आहे.

जावडेकर यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “जनतेच्या मागणीनुसार उद्या २८ मार्चपासून दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर पुन्हा‘ रामायण ’चे प्रक्षेपण सुरू होईल. पहिला भाग सकाळी ९.००वाजता आणि दुसरा भाग रात्री ९.०० वाजता प्रसारित होईल.

१९८७ मध्ये ‘रामायण’ चा पहिला भाग दूरदर्शनवर प्रसारित झाला होता. अभिनेता अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लाहिरी अलीकडेच ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये दिसले होते.

 

रामानंद सागर यांनी ‘रामायण’ ची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते. या दूरचित्रवाणी मालिकेत दारा सिंग हनुमानची भूमिका साकारली होती.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तुमचे नाव आहे का? ‘इथे’ करा चेक, वर्षाला मिळतात ६ हजार रुपये!

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली १४७ वर; तुमच्या जिल्ह्यात किती?

महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”

भारतात या ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन