Sunday, January 29, 2023

World Record । ‘रामायण’ ठरली जागतिक स्तरावर सर्वाधिक पाहिलेली मनोरंजन मालिका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी । ऐंशीच्या दशकातील भारताचे महाकाव्य पौराणिक कथा ‘रामायण’ च्या पुनःप्रसारणाने जागतिक स्तरावर सर्वोच्च विक्रम नोंदवला आहे. 16 एप्रिल 2020 रोजी प्रसारीत केले गेलेले प्रसारण हे जगभरातील 7.7 कोटी प्रेक्षकांनी पाहिले आहे.

लॉकडाउनच्या काळात सुरू झालेली ही मालिका TRP च्या बाबतीत सुरवातीपासून इतर सर्व मनोरंजन वाहिन्यांना मागे टाकत आहे. 16 एप्रिलच्या प्रसारणामुळे आता ही मालिकाजागतिक स्तरावर सर्वाधिक पाहिलेली मनोरंजन मालिका ठरली आहे.

- Advertisement -

16 एप्रिल च्या प्रसारणामध्ये लक्ष्मण आणि मेघनाद इंद्रजित यांचे युद्ध दाखवण्यात आले होते. सदर प्रसंग हा दोन बलशाली युद्धवीर यांच्यातील होता. याच प्रसंगात हनुमानाने संजीवनी साठी उड्डाण केले होते. सदर संपूर्ण युद्ध प्रसंग हे एकूण तीन प्रसारण यांमध्ये दाखवले गेले आहे.

देशात प्रथमच हे मालिका 25 जानेवारी 1987 ते 31 जुलै 1988 या काळात प्रसारित झाली. त्यानंतर दर रविवारी सकाळी 9.30 वाजता टीव्हीवर हा कार्यक्रम प्रसारित होत असते. रामानंद सागर यांनी वाल्मिकीच्या रामायण आणि तुलसीदास यांच्या रामचरितमानसवर आधारित या मालिकेचे एकूण 78 भाग केले होते.