हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ramayana Movie) गेल्या अनेक दिवसांपासून ‘रामायण’ सिनेमाची सोशल मीडियावर चर्चा आहे. या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार? याबाबत सर्वांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली होती. दरम्यान, अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले. इतकेच काय तर रणबीरचा टेस्ट लूक देखील सोशल मीडियावर रिलीज झाला होता. त्यामुळे प्रेक्षकांच्या त्याच्याकडून आणखीच अपेक्षा वाढल्या. दरम्यान माता सीतेच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री झळकणार यावर चर्चा सुरु होती. अशातच सेटवरून काही फोटो लीक झाले आहेत. ज्यामध्ये श्रीराम आणि सीतेच्या भूमिकेत रणबीर आणि साई पल्लवी दिसून आले आहेत.
रणबीर साकारतोय प्रभू श्रीरामांची भूमिका (Ramayana Movie)
अभिनेता रणबीर कपूरने आजपर्यंत अनेक ढंगाच्या वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. मात्र पहिल्यांदाच तो अध्यात्मिक कथानकात दैवी भूमिकेत दिसणार आहे. मध्यंतरी प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत रणबीरचा टेस्ट लूक समोर आला होता. जो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच ताणली गेली. त्याच्या लुकला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. दरम्यान, शूटिंग सेटवरून व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या लूकमध्ये दिसून आला आहे.
साई पल्लवी साकारतेय माता सीता
प्रभू श्रीरामाच्या भूमिकेसाठी अभिनेता रणबीर कपूरने मोठी मेहनत घेतली असून सेटवरून त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. मुंबईत ‘रामायण’च्या चित्रीकरणासाठी भव्य सेट लावण्यात आला आहे. या सेटवरून श्री राम आणि सीतेच्या व्यक्तीरेखेत असलेल्या रणबीर अन साई पल्लवीचे फोटो लीक झाले आहेत. (Ramayana Movie) ज्यामध्ये रणबीर आणि साई पल्लवी एकत्र दिसत आहेत. त्यांनी मरून आणि जांभळ्या रंगाचे शाही आउटफिट परिधान केले आहेत. विशेष दागिन्यांसह त्यांनी हे लूक पूर्ण केले आहेत. साई पल्लवीच्या चेहऱ्यावरील साधेपणा तिच्या लुकला आणखी आकर्षक करत आहे.
‘रामायण’मध्ये झळकणार ‘हे’ कलाकार
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ सिनेमामध्ये रणबीर कपूर हा प्रभू श्री रामाच्या भूमिकेत तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच भगवान हनुमानाच्या भूमिकेत सनी देओलच्या नावाची घोषणा करणार आहेत. तर कुंभकर्णच्या भूमिकेसाठी बॉबी देओलला विचारण्यात आले आहे. (Ramayana Movie) असेही म्हटले जात आहे की, विजय सेतुपती रावणाचा भाऊ विभीषणाची भूमिका साकारणार आहे. शिवाय कैकयीच्या व्यक्तीरेखेत लारा दत्ता आणि मंथराच्या व्यक्तीरेखेत शीबा चढ्ढा दिसणार आहेत. राजा दशरथाच्या भूमिकेत अरुण गोविल आणि रावणाच्या भूमिकेत अभिनेता यश दिसणार असल्याचे बोलले जात आहे.