NDA ने आम्हाला बिहार निवडणूकी मध्ये पाच जागा द्याव्यात ; नाहीतर आम्ही स्वतंत्रपणे 15 जागांवर लढू – रामदास आठवले

मुंबई प्रतिनिधी । रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) चा घटक पक्ष आहे. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष NDA च्या सोबत बिहार निवडणूकीमध्ये उतरेल. त्यामुळे आम्हाला देखील ह्या निवडणूकी मध्ये सहभागी करून घ्यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

जागा वाटप करते वेळी आमच्या पक्षाला 05 जागा NDA गठबंधन मध्ये मिळाव्यात. जर NDAच्या बिहार विधानसभा निवडणुक जागा वाटप मध्ये आम्हाला पाच जागा नाही मिळाल्यात तर आम्ही बिहार मध्ये आमचा पक्ष म्हणून स्वतंत्र लढू.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षातर्फे आम्ही 15 जागांवर निवडणूक लढवू. तसेच ह्या स्वरूपात बिहार मध्ये जरी निवडणूक झाली तरी उर्वरित भागात आमचा NDA ला पाठिंबाच असेल ,असेही आठवले म्हणाले.


You might also like