रामदास आठवलेंचा जावईशोध : कोरोनामुळे बैलगाडी शर्यतीवर बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | बैलगाडी शर्यतीवर कोरोना असल्यामुळे बंदी घालण्यात आल्याचा जावईशोध केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व आरपीआईचे राष्ट्रीय अध्यक्ष (आठवले) रामदास आठवले यांनी लावला आहे.

कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बैलगाडा शर्यती संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावर रामदास आठवले म्हणाले, बैलगाडी शर्यती होतच असतात, मात्र दोन वर्ष झाले कोरोना असल्यामुळे आणि गर्दी होत असल्याने काही ठिकाणी त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. ग्रामीण भागात क्रिकेट आहे त्याच्या स्पर्धा होतात त्याप्रमाणे गावात बैलगाड्याच्या शर्यतीला परवानगी द्यावी.

गावात बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यायला काही हरकत नाही. तसेच बंदी असेल तर कोरोना संपल्यानंतर राज्य सरकारने बैलगाडी शर्यतीला परवानगी दिली पाहिजे. या कृषिप्रधान देशाच्या केंद्रीय मंत्र्याच्या वक्तव्याने शेतकऱ्यांच्यात व बैलगाडा प्रेमींच्यात नाराजी दिसून येणार आहे.