पवारांनीच डाव साधून शिवसेना फोडली; रामदास कदम यांचा गंभीर आरोप

0
68
ramdas kadam
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मंत्री रामदास कदम यांनी आपल्या शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस वर जोरदार निशाणा साधला. शरद पवार यांनीच डाव साधला आणि शिवसेना फोडली असा मोठा आरोप त्यांनी केला. Tv9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास कदम यांनी शिवसेनेतील आपली नाराजी बोलून दाखवली यावेळी त्यांना अश्रु अनावर झाले.

उद्धव ठाकरे भोळे आहेत. त्यांना शरद पवारांचा डाव कळला नाही. शरद पवार आणि अजित पवार यांनी शिवसेना फोडली. उद्धव साहेब आजारी असल्याने घरीच होते, त्यातच अजित पवार  यांचा प्रशासकीय अनुभव प्रचंड आहे, त्याच्या जोरावर त्यांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला असे रामदास कदम यांनी म्हटले आहे. पक्ष फुटतोय तरी तुम्हाला शरद पवार का हवेत?? असा सवालही रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना केला.

बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेस राष्ट्रवादीचा विरोध केला होता. मी उद्धव ठाकरे यांना हात जोडून विनंती केली होती की, या दोन्ही काँग्रेसबरोबर बसू नका. त्यांना ते नाही पटले. आज आपण सर्वांनी उभी केलेली शिवसेना कोसळताना पाहून दुःख वाटत अस म्हणत रामदास कदम ढसाढसा रडू लागले. आपण भगवा कधीही सोडणार नाही. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असेही रामदास कदम म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here