हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यात वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरूच आहे. त्यातच आता योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. महिलांना काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात असं विधान त्यांनी केलं आहे.
ठाण्यातील योगा कार्यक्रमामध्ये बोलताना रामदेव बाबा यांची जीभ घसरली. या कार्यक्रमात महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते. त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महासंमेलानासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. यावेळी रामदेव बाबा म्हणाले, साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही. साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योग्य कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे रामदेव बाबा यांच्या या विधानामुळे आणखी वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.