रामदेव बाबांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ व्हिडिओ नंतर IMAने केली कारवाईची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एका व्हिडीओमध्ये रामदेव बाबा यांनी कोरोनावरील एलोपॅथी उपचार पद्धतीबाबत अविश्वासार्हता दर्शवली आहे. त्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)ने आक्रमक भूमिका घेतलीय. रामदेव बाबा यांच्यावर कारवाई कठोर कारवाई करण्याची मागणी IMAने केली आहे.

देश करोनाची लढाई लढत आहे. लोकांचे जीव वाचवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीने उपचार सुरु आहेत. भारत सरकारही करोनाचा फैलाव रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. या लढाईत आतापर्यंत १२०० अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनी जीव गमवला आहे. असं असताना योगगुरु रामदेव आपल्या व्हिडिओत अ‍ॅलोपॅथी एक मूर्ख आणि बिनकामाचं विज्ञान आहे, असं सांगताहेत’, याकडेही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं.

रामदेव बाबा नक्की काय म्हणाले –

एका व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रामदेव बाबांनी एलोपॅथी ही एक मूर्ख आणि लंगडे विज्ञान असल्याचं सांगत त्याबाबत अविश्वास दाखवलाय. सर्वात आधी हायड्रोक्लोरिक्विन फेल ठरले. त्यानंतर प्लाझ्मा थेरपी आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शन, फॅबिफ्लू फेल ठरल्याचं रामदेव बाबा यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर आज लाखो लोकांचा मृत्यू हा एलोपॅथीमुळे झाल्याचा दावाही त्यांनी केलाय.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment