आयपीएल स्थगित झाली नसती तरी सोडून गेलो असतो, चहलने केला मोठा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – चहलने आयपीएल संदर्भात मोठा खुलासा केला आहे. जर आयपीएल स्थगित झाली नसती, तरी आपण स्पर्धा अर्ध्यातूनच सोडून निघून जाणार होतो, असा खुलासा युझवेंद्र चहलने केला आहे. चहलच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याने आयपीएल सोडण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला होता. 3 मे रोजी चहलच्या आईवडिलांना कोरोनाची लागण झाली होती. यादरम्यान चहलची पत्नी धनश्री वर्मा बायो-बबलमध्ये होती. यानंतर चहलच्या वडिलांची तब्येत जास्त खराब झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर त्याच्या आईवर घरातच उपचार करण्यात आले.

आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने यंदाची आयपीएल स्थगित करण्यात आली. खेळाडूंसह सपोर्ट स्टाफनासुद्धा कोरोनाची लागण झाली. या मोसमात आरसीबीला मोक्याच्या क्षणी विकेट घेऊन देणारा युझवेंद्र चहल पूर्णपणे अपयशी ठरला होता. त्याला 7 मॅचमध्ये फक्त 4 विकेट मिळाल्या होत्या. यानंतर आता युझवेंद्र चहल श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.

श्रीलंका दौऱ्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे आणि टी-20 सीरिज होणार आहे. हि सिरीज युझवेंद्र चहलसाठी खूप महत्वाची असणार आहे. कारण खराब फॉर्ममुळे तो बहुतेकवेळा टीमच्या बाहेर असतो. जर त्याने या सिरीजमध्ये चांगली कामगिरी केली तरच त्याची टी-20 वर्ल्ड कपसाठी निवड होऊ शकते. श्रीलंका दौऱ्यात राहुल चहर आणि युझवेंद्र चहल यांच्यात मोठी चुरस निर्माण होणार आहे. दोघेपण स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील. यंदाच्या आयपीएलमध्ये राहुल चहरने मुंबईकडून खेळताना 7 सामन्यांमध्ये 11 विकेट घेतल्या, त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपसाठी या दोन लेग स्पिनर्समध्ये स्पर्धा निर्माण होणार आहे.

Leave a Comment