केंद्रीय मंत्री संजय धोत्रेंची सभा रणजित पाटील समर्थकांनी उधळली

0
54
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकोला प्रतिनिधी । अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर विधानसभेचे उमेदवार हरीष पिंपळे यांनी गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. याचाच जाब केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांना रणजित पाटील समर्थकांनी त्यांना विचारला. यातून एकच गोंधळ उडवत पाटील समर्थकांनी अखेर धोत्रेंची सभा उधळली. पिंजर इथं आयोजित सभेत हा सर्वप्रकार घडला.

दरम्यान भाजपचे उमेदवार आमदार हरीश पिंपळे यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या वक्तव्यांच्या विरोधात सर्वच पक्षातील मराठा कार्यकर्ते एकवटले आहेत. भाजपच्या एका नेत्यावर टीका करताना नको ते बोलल्यामुळं मराठा समाजही दुखावला आहे. आता पिंपळे यांच्या विरोधात मराठा समाज उतरल्यानं मूर्तिजापूर मतदारसंघातील निवडणुकीनं एक वेगळ वळण घेतलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here