बँगलोर : वृत्तसंस्था – रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) फायनलमध्ये आज मध्य प्रदेशने मुंबईला हरवून इतिहास रचला आहे. या सामन्यात मध्य प्रदेशने मुंबईचा 6 विकेटने पराभव केला आहे. 41 वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबईने मध्य प्रदेशला शेवटच्या इनिंगमध्ये विजयासाठी 108 रनचे आव्हान दिले होते. हे आव्हान मध्य प्रदेशने 4 विकेट गमावून पार केलं. मध्य प्रदेशकडून हिमांशू मंत्रीने 37 रन केले, तर शुभम शर्मा 30 रनवर नाबाद राहिला. मुंबईकडून शम्स मुलानीने तीन आणि धवल कुलकर्णीने 1 विकेट घेतली.
या आव्हानाचा पाठलाग करताना (Ranji Trophy) मध्य प्रदेशची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. टीमचा स्कोअर 2 रन झालेला असतानाच धवल कुलकर्णीने यश दुबेला बोल्ड करून टीमला पहिले यश मिळवून दिले. यश एक रनवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर हिमांशू 3 फोरच्या मदतीने 37 रन करून आऊट झाला. त्याआधी मुंबईने पाचव्या दिवशी 2 विकेटवर 113 रनवर दिवसाची सुरूवात केली. अरमान जाफर 30 रनवर आणि सुवेद पारकर 9 रनवर नाबाद होते. जलद रन करण्यासाठी मुंबईने कर्णधार पृथ्वी शॉसोबत हार्दिक तोमरेला इनिंगची सुरूवात करायला पाठवलं होतं. शॉने 52 बॉलमध्ये 44 तर तोमरेने 25 रन केले.
मॅचच्या (Ranji Trophy) शेवटच्या दिवशी अरमान जाफर 37 रनवर आऊट झाला, यानंतर सुवेदने दुसरी बाजू सांभाळून घेतली. 51 रन करून सुवेद माघारी परतला. या मोसमात धमाकेदार कामगिरी केलेल्या सरफराज खानला 48 बॉलमध्ये 45 रन करता आले. यगोदर मध्य प्रदेश चंद्रकांत पंडित यांच्या नेतृत्वात 1998-99 साली रणजी ट्रॉफी फायनलमध्ये (Ranji Trophy) पोहोचली होती मात्र त्यांना रणजी जिंकता आली नव्हती. आता चंद्रकांत पंडित हे मध्य प्रदेशचे मुख्य प्रशिक्षक आहेत. 88 वर्षांच्या इतिहासात मध्य प्रदेशला पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीवर (Ranji Trophy) आपलं नाव कोरता आलं आहे.
हे पण वाचा :
मंत्रिपद काढा की आता, पाठिंबा काढला आहे न्हवं; शंभुराज देसाईंच्या पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंटचा पाऊस
जितेंद्र आव्हाडांच स्वप्न होणार साकार; ‘शाहू छत्रपती’ चित्रपटाची दमदार घोषणा
च्यायला ! मी कधी जातीयवादी पोस्ट केली..?; नेटकऱ्याच्या मॅसेजवर किरण माने वैतागले