देश वाचविण्यासाठी दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्याची गरज; रणजितसिंह देशमुखांचा भाजपवर हल्लाबोल

Ranjitsinh Deshmukh Narendra Modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
देशाची अर्थव्यवस्था व लोकशाही खिळखिळी बनवणाऱ्या भाजपच्या मोदी सरकारने संपूर्ण देशातील सर्वसामान्य जनतेला बेकारी, महागाईच्या डोंगराखाली गाढले आहे. सामान्य जनता व देश वाचविण्यासाठी दुसरा स्वातंत्र्य लढा उभारण्याची गरज आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रणजितसिंह देशमुख यांनी भाजपवर केला.

सातारा जिल्ह्यातील वडूज येथे खटाव तालुका काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकत्यांची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी ज्येष्ठ नेते राजूभाई मुलाणी, तालुकाध्यक्ष डॉ. संतोष गोडसे, डॉ. महेश गुरव, सत्यवान कमाने, परेश जाधव, पांडुरंग खाडे, आनंदा साठे, राहुल सजगणे, इम्रान बागवान आदी उपस्थित होते.

यावेळी सत्यवान कमाने यांनी प्रास्ताविक केले. विजय शिंद सूत्रसंचालन यांनी केले. अमरजित कांबळे यांनी आभार मानले. या वेळी माजी सरपंच सदाशिव खाडे, जोतिराम बागल, आकाराम खाडे, राजेंद्र माने, नीलेश चार्गे, सयाजी सुर्वे आदी उपस्थित होते.