औरंगाबाद प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीसोबतच जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही पार पडणार आहेत. यापार्श्वभूमीवर काँग्रेस-शिवसेना युतीबाबत अविश्वास ठराव आणा, मी शिवसेनेची हमी घेतो, असं आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिले.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. यासोबतच जिल्हा परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकाही पार पडणार आहेत. त्याकरिता रावसाहेब दानवे यांनी जालना येथे कार्यकत्यांच्या बैठका घेतल्या .
शिवसेनेने जाणीवपूर्वक भाजप सदस्यांना विकासनिधी उपलब्ध करून नदिल्याने आमच्या गटात कामं झाली नाहीत. त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागत असल्याची तक्रार भाजपच्या सदस्यांनी दानवेंसमोर केली. यावेळी कार्यकर्त्यांचा रोष पाहून दानवे यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला . तसेच शिवसेनेबाबत सावध पवित्रा घेत कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले .
पूरग्रस्तांच्या सेवेसाठी शिवसेनेने पाठवले १०० डॉक्टर
महाराष्ट्र भाजपच्या लोकप्रतिनिधींनी १ महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना द्यावे : चंद्रकांत पाटील
पूरग्रस्तांना धमकी द्यायला चंद्रकांत पाटील हे जनरल डायर आहेत का : राष्ट्रवादी