फडणवीसांची चौकशी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा; दानवेंची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोलीस घोटाळा प्रकरणी भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबई पोलिसांकडून दोन तास चौकशी करण्यात आली. यांनतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकार वर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांची चौकशी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे

रावसाहेब दानवे म्हणाले, एखाद्य विरोधी पक्षनेत्याने आपल्या लेवलवर एखादी माहिती उपलब्ध केली आणि सार्वजनिक केली तर ती माहिती तुम्ही कुठून उपलब्ध केली हे विचारण्याची पद्धत नाही. यापूर्वीच फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्र्याना पोलीस बदली घोटाळ्याबाबत पत्र लिहिले आहे. आणि कोर्टाने ते प्रकरण सीबीआय कडे सोपवले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची चौकशी होण्यापेक्षा ज्यांनी हे घोटाळे केले त्यांची चौकशी झाली पाहिजे. फडणवीस यांची चौकशी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत असे दानवे म्हणाले

दरम्यान, या दोन तासांच्या पोलीस चौकशी नंतर फडणवीस यांनी सरकार वर निशाणा साधला. हा महाघोटाळा मी जर बाहेर काढला नसता तर कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा दबून गेला असता. मला कितीही गोवण्याचा प्रयत्न केला तरी मी गप्प बसणार नाही, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला

Leave a Comment