Wednesday, October 5, 2022

Buy now

“मी मर्द शिवसैनिक, घाबरण्याचा प्रश्नच नाही”; फडणवीसांच्या टीकेला संजय राऊत यांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज पोलिसांकडून दोन तास चौकशी करण्यात आली. दोन तासांच्या चौकशीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत संजय राऊतांवर निशाणा साधला. ‘मी खुलेपणाने बोललो की मी चौकशीला जायला तयार आहे. संजय राऊत रोज घाबरून पत्रकार परिषद घेतात. रोज केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप करतात अशी टीका केल्याने आता राऊतांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ऐकण्यात व पहाण्यात काही तरी दोष निर्माण झालाय. संजय राऊत मर्द शिवसैनिक आहे. घाबरण्याचा प्रश्नच नाही, असा पलटवार राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून फडणवीसांना उत्तर दिले आहार. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ऐकण्यात व पहाण्यात काही तरी दोष निर्माण झालाय. संजय राऊत मर्द शिवसैनिक आहे. घाबरण्याचा प्रश्नच नाही. केंद्रीय तपास यंत्रणा किती खोटे पणाने कारवाया करतात याचा पोलखोल करण्यासाठी मी दोन पत्रकार परिषद घेतल्या.पुराव्यासह. इतकेही खोटे बोलू नका”, असा सल्लाही राऊत यांनी फडणवीसांना दिला आहे.

काय केली होती फडणवीसांनी टीका?

आज पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, “मी खुलेपणाने बोललो की मी चौकशीला जायला तयार आहे. संजय राऊत रोज घाबरून पत्रकार परिषद घेतात. रोज केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप करतात. मी तर सांगितलं की मी यायला तयार आहे. कुठे बोलवायचं तिथे बोलवा. त्यांच्यात हिंमत आहे का? ते रोज पत्रकार परिषदेत म्हणतात मला का बोलावलं? मला का बोलावलं? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहजे’, असे फडणवीस यांनी म्हंटले होते.