मुंबईहून रेल्वेने जालन्यात, विनामास्क ग्रामस्थांशी चर्चा.. दानवे पॉझिटीव्ह आल्यानं ग्रामस्थ चिंतेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. रावसाहेब दानवे यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. परंतु कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वी दानवे हे मुंबईहुन रेल्वेने जालन्यात आले होते तसेच ग्रामस्थांशी विना मास्क संवाद साधला. यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेच वातावरण आहे.

कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने,माझी कोरोना टेस्ट केली असता टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आयसोलेशन मध्ये आहे,याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी,त्याच प्रमाणे माझ्या संपर्कात असलेल्यांनी स्वतःची तात्काळ टेस्ट करावी व काळजी घ्यावी. असे ट्विट रावसाहेब दानवे यांनी केलं होत.

दरम्यान, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्यापूर्वी रावसाहेब दानवे यांनी काल जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेशी संवाद साधला. जालना ते भोकरदन प्रवासात, माझ्या गावी जाताना वाटेमध्ये लागणाऱ्या राजूर, लिंगेवाडी, बाभुळगाव येथिल गावकऱ्यांशी संवाद साधला तसेच गावकऱ्यांनी देखील आपली मते व्यक्त केली असे ट्विट रावसाहेब दानवे यांनी काल सकाळीच केलं होतं.

मुळामध्ये कोरोनाची लक्षणे असताना दानवे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधलाच कसा असा प्रश्न उपस्थित होतो. कोरोना चाचणी केल्यानंतर तो रिपोर्ट येईपर्यंत दानवे यांनी काळजी घायला हवी होती. तसेच तोपर्यंत कोणाच्या संपर्कात न येण्याचा प्रयत्न करायला हवा होता. मात्र अनेक लोकांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी इतरांना तात्काळ चाचणी करण्यास सांगितले.

राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मास्क वापरा अन्यथा दंड भरा असा नियम घालून सरकारच सामान्य नागरिकांकडून संद आकरुन मास्क वापरण्याची सक्ती करत आहे. पंतप्रधान मोदीही कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेण्याच्या सुचना प्रशासनाला देत आहेत. मात्र अशात केंद्रीय मंत्रीच स्वत: मास्क घालत नसतील तर याला बेजबाबदारपणा म्हणायचा काय? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

Leave a Comment