नवी दिल्ली | रावसाहेब दानवे यांना केंद्रात राज्यमंत्री पद मिळाल्या नंतर भाजपमध्ये आता नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा सुरु झाली आहे. नव्या मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्या नंतर रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदावर भाष्यकरणे टाळले आहे. आपण आपल्या मंत्री पदाचा महाराष्ट्राला जास्तीस जास्त फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे अशी ग्वाही देखील रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.
भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण या प्रश्नाचे उत्तर देताना रावसाहेब दानवे म्हणाले कि आत्ताच माझ्या तोंडून कशाला सगळ काढून घेता. प्रदेशाध्यक्ष पदाच्या प्रश्नाचे उत्तर देताना रावसाहेब दानवे यांनी आपल्या बिनदास्त स्वभावाला साजेसे उत्तर दिले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी सध्या भाजपचे चिटणीस संजय कुटे , शिक्षण मंत्री विनोद तावडे , ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र भाजप पक्ष श्रेष्ठि यावर काय निर्णय घेणारा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.