इयत्ता २ री मध्ये शिकणार्‍या मुलीचा बलात्कार करुन खून; मृतदेह टाकला ओढ्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण : इयत्ता दुसरी मध्ये शिकणार्या एका सात वर्षी मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यात घडला आहे. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील रवले- सुतारवाडी येथे ही घटना घडली आहे. नराधमाने बलात्कार केल्यानंतर खून करून मुलीचा मृतदेह ओढ्यामध्ये टाकून दिल्याचं समोर आलं आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती नुसार, पाटण तालुक्यातील रवले – सुतारवाडी येथे अल्पवयीन मुलगी काल बुधवारी दि. 29 रोजी बेपत्ता झाली होती. दुपारी साडेतीनच्या दरम्यान बाहेर खेळायला गेलेली मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी परतली नसल्याचे गिरणीतून घरी आलेल्या तिच्या आज्जीच्या लक्षात आले. त्यांनतर घरातील नातेवाईकांसह गावातील युवकांनी मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत मुलीचा शोध लागला नाही. यावेळी ढेबेवाडी पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली.

गवत कापण्यासाठी म्हणुन शेतात घेऊन गेला अन् बलात्कार केला; 2 री मध्ये शिकणार्‍या मुलीचा खून

मुलगी बेपत्ता माहिती मिळाल्यानंतर ढेबेवाडी पोलिसांनी संशयित संतोष थोरात याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता मुलीचा ठावठिकाणा मिळाला. संशयिताने सदर मुलीचा बलात्कार केल्यानंतर गळा आवळून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सुतारवाडी येथील एका ओढ्यात मुलीचा मृतदेह आढळून आला. मुलीच्या घरापासून जवळपास पाचशे मीटरवर तो मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

गवत कापायला म्हणून शेतात घेऊन गेला अन बलात्कार केला

नराधम सदर मुलीला गवत कापण्यासाठी म्हणून शेतात घेऊन गेला होता. यावेळी एकटेपणाचा फायदा घेऊन त्याने तिच्यावर अतिप्रसंग करत बलात्कार केला. यानंतर तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह ओढ्याजवळ झुडपात टाकून दिला. अशी माहिती उपस्थित गावकर्यांनी सांगितली.

खून करून आरोपी गावकऱ्यांसोबत मुलीच्या शोधकार्यात?

नराधमाने बालिकेचा बलात्कार करून खून केल्यानंतर मृतदेह ओढ्यात टाकून तो घरीआला. गावात सर्व गावकरी मुलीची शोधाशोध करत असल्याचं पाहून तोही शोधकार्यात सहभागी झाला. त्यानंतर पोलिसांना त्याचा संशय आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पोलिसांची चौकशी केली. तेव्हा त्यांने सदर गुन्ह्याची कबुली दिली.

फाशी नाही तर चौकात मारा

मृत मुलीची अवस्था नराधमाने इतकी वाईट केली होती कि डोळ्यांना पाहवत न्हवते. अशा नराधमाला फाशी नाही तर त्याला चौकात कपडे काढून मारायला हवं अशी मागणी ग्रामस्थाने केली आहे.

तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील रवले- सुतारवाडी येथे संतापजनक प्रकार घडलेला आहे. एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. संतोष थोरात असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नांव आहे. घटनास्थळी सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे किशोर धुमाळ, कराडचे डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील,उपस्थित होते

ढेबेवाडी येथून ७ किलोमीटर अंतरावर डोंगर परिसरात रवले- सुतारवाडी गाव आहे. या घटनेने सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली. घटनास्थळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट देवून घटनेची माहिती घेतली. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत.

 

Leave a Comment