विवाहित तरुणाकडूनच लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

0
35
Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहरात दिवसागणिक महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होतच आहे. यामुळे शहरात महिला कितपत सुरक्षित आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता एका विवाहित तरुणानेच लग्नाचे अमिश दाखवून मुंबईतील तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

विवाहित तरुणाने मुंबईतील एका परिचारिकेवर सतत तीन वर्षे लैंगिक अत्याचार केला. तसेच स्वतःचे लग्न झाल्याची बाब तिच्यापासून त्याने लपवून ठेवली. याप्रकरणी पीडित २३ वर्षीय तरुणीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून राजेश प्रेमानंद पवार (२९, रा. बजाजनगर, औरंगाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार २०१८ ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत बजाजनगर, वानखेडेनगर आणि पुणे येथे राजेशने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित तरुणी मुंबईतील एका रुग्णालयात परिचारिका आहे. तिच्यासोबत राजेशने प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्याचे लग्न झालेले आहे ही बाब त्याने लपवून ठेवली. लग्नाची मागणी केल्यावर तो टाळाटाळ करत होता. राजेशचे आधीच लग्न झालेले असल्याची माहिती पीडित तरुणीला ऑगस्ट महिन्यात माहित झाली. त्यानंतर पीडित तरुणी आणि राजेशमध्ये वाद झाले. अखेर काल पीडित तरुणीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here