कल्याण : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेकडील निर्मनुष्य असलेल्या रेल्वेच्या क्वार्टरमध्ये एका मूकबधिर तरुणीवर एका नराधमाने बलात्कार करून तिच्याजवळील मोबाईल हिसकावून तेथून पळ काढला होता. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी या आरोपीच्या शोधासाठी 5 तपास पथके तैनात केली होती. अखेर त्या नराधमाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपीला कल्याण पोलिसांनी गुजरातहून अटक केली आहे.
या नराधमाचे नाव अश्विन राठवा असे त्याला कल्याण न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडित तरुणी कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरामध्ये राहते. ती एका कुरिअर कंपनीच्या कार्यालयात काम करते. 2 जुलै रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास ती घरातून निघाली. तेव्हा तिच्या भावाने कल्याण पूर्व भागातील स्टेशन परिसरात तिला सोडले. त्यानंतर ती रस्त्याने पूर्व भागातून पश्चिमेला गेली. हि मुलगी कल्याण पश्चिमेतील रेल्वे कॉलनीत पोहचली असता एका निजर्नस्थळी आरोपीने तिला गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तो तिचा मोबाईल हिसकावून तिकडून पसार झाला. यानंतर हि तरुणी कशीबशी सुभाष चौकात पोहचली.
ज्या ठिकाणी कामावर जाण्यासाठी तिला बस पकडायची होती, तिथे एका महिलेने तिला पाहिले. तिच्या सोबत काय घडले असावे, याची कल्पना तिला लगेच आली. यानंतर या महिलेने पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी तातडीने या तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. कल्याण स्थानकात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. हा आरोपी ठाणे सीसीटीव्हीतही दिसून आला. यानंतर कल्याणचे महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस आणि गुन्हे शाखा आरोपीचा शोध घेत होते. अखेर ९ दिवसांनी पोलिसांना या आरोपीचा थांगपत्ता लागला. यानंतर पोलिसांनी आरोपीच्या एका मित्राला ताब्यात घेऊन त्याच्याकडून आरोपी कोण आहे, तो कुठे आहे याची माहिती घेतली. यानंतर पोलिस अधिकारी दीपक सरोदे, पोलिस कर्मचारी सचिन भालेराव, सोमनाथ ठिकेकर, रविंद्र हासे यांच्या पथकाने अश्विन राठवा याला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलिस अधिकारी मंजूषा शेलार करीत आहेत.