अरब राष्ट्रांप्रमाणे गुन्हेगारांना भर चौकात थेट फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी; इम्तियाज जलील यांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असून या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन देताना, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी ट्विट करत अशा गुन्हेगारांना अरब राष्ट्रांप्रमाणे फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.

साकीनाका येथील घटना दुर्दैवी, चीड आणणारी आणि विकृत मानसिकतेचा कळस गाठणारी आहे. मला माहिती आहे की, आपल्या देशात कायदेशीररित्या या गोष्टीला परवानगी नाही. पण बलात्कारासारख्या घटना रोखून नराधमांवर वचक बसवायचा असेल तर अरब राष्ट्रांप्रमाणे अशा गुन्हेगारांना भर चौकात थेट फाशी देण्याची तरतूद कायद्यात करायला हवी’, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

 

माणुसकीला काळिमा फासणारे हे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल. एका महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करावे, जलदगती न्याय काय असतो ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे जेणे करून पुढे कुणी अशी हिंमत करणार नाही’, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी पोलिसांना दिलेत.

Leave a Comment