हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणांमध्ये वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक पदाच्या सेवाज्येष्ठतेच्या यादीत रश्मी शुक्ला यांचे नाव अग्रस्थानी होते. अखेर आज त्यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी आली आहे. यापूर्वी रश्मी शुक्ला आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक मोठ्या वादात सापडल्या होत्या.
पोलिस महासंचालक पदासाठी नियुक्त करण्यात आलेल्या रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिला महिला असणार आहेत. खरे तर, रश्मी शुक्ला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती समजल्या जातात. त्यांच्यावर पुणे आणि मुंबई अशा दोन ठिकाणी वेगवेगळ्या गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु पुढे जाऊन कोर्टाने त्यांचे हे गुन्हे रद्द केले.
गेल्या 29 डिसेंबर रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाने एक महत्वपूर्ण बैठक घेतली होती. या बैठकीत महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांची नावे केंद्रस्थानी ठेवली होती. त्यामध्ये रश्मी शुक्ला यांचे देखील नाव होते. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री यांनी रश्मी शुक्ला यांची पोलिस महासंचालक पदासाठी निवड केली. त्यामुळे आता नवे पद आल्यानंतर रश्मी शुक्ला पुन्हा महाविकास आघाडीतील नेत्यांना धारेवर धरतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.