टीम, HELLO महाराष्ट्र| अनेकजण गणपतीला पंच पक्वान्नचा नैवद्य करतात. त्यासाठी आज आपण रतळ्याच्या करंज्या कशा करयाच्या ते जाणून घेणार आहोत.
साहित्य –
५०० ग्रॅम रताळी, २०० ग्रॅम गूळ, २ वाटी ओल्या नारळाचा चव, वेलची पूड, १ वाटी मैदा, चिमूटभर मीठ आणि तळायला तूप.
कृती –
1) नारळात गूळ आणि वेलची पूड घालून मिश्रण चांगलं एकत्र करून ठेवावं.
2) रताळी उकडून घ्यावी. ती कुस्करून त्यातील दोरे काढून टाकावे.
3) सर्व गर मळून त्यात मैदा व मीठ मिसळावा व मिश्रण चांगलं मळून घ्यावं.
4) या मिश्रणाचे लिंबाएवढे गोळे घेऊन पुरी लाटावी. त्यात नारळाचे सारण भरून हलक्या हातांनी दुमडावी आणि पारी बंद करून ती गरम तुपात दोन्ही बाजूंनी बदामी रंगावर तळून घ्यावी.
या गरमागरम खुसखुशीत करंज्यांचा नैवेद्य गणपती बाप्पाला नक्की आवडेल.