‘रतन टाटा’ एक उत्तुंग शिखर

0
63
Ratan Tata
Ratan Tata
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

” योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही,निर्णय घेऊन तो योग्य सिद्ध करावा”

वाढदिवस विशेष | ह्या उक्तीप्रमाणे स्वतःला सिध्द करणार एक असामान्य व्यक्तिमत्व,जगविख्यात उद्योजक,किर्तीवंत,जगभरातील काही नामवंत कंपनीचे मालक,सामाजिक कार्यात मोलाचे काम करणारे अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणजे रतन टाटा यांनी भारताचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविले ते आपल्या मेहनतीने आणि दृढ निश्चयाने.

भारतातील खूप नगण्य कंपन्या सुरू करून शंभर वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक टिकाव धरतात पण एक “टाटा ग्रुप” आहे जी गेल्या दीडशे वर्ष टिकून आहे आणि शंभर हुन अधिक कंपन्या शंभर पेक्षा जास्त देशात व्यवसाय करत आहे की ज्यात ‘टाटा स्टील ,टाटा मोटर्स, टाटा पॉवर , टायटन, ताज ग्रुप,लॅकमी,टीसीएस इ.’ ह्या नामवंत कंपन्यांचा वाटा आहे.

रतन सरांच्या आयुष्यातील एक प्रसंग मला सांगावा वाटतो ,टाटा मोटर्स ने बनवलेली इंडिका कार जेव्हा तोट्यात चालली तेव्हा रतन सर फोर्ड कडे कार ची मालकी देण्यासाठी गेले पण अपमानित होऊन परत आले आणि काही काळाने त्याच फोर्ड च्या उतरत्या काळात ‘जग्वार’ आणि ‘लँड रोवर’ सारखे मोठे ब्रँड टाटा ने विकत घेतले. ‘टेटली’ चहाची कंपनी विकत घेऊन ‘टाटा टी’ ला जगातली दोन क्रमांकाची मोठी कंपनी बनवली.तसेच दानशूर ,उदार कर्णाप्रमाणे रतन सर कमाईच्या अर्ध्यापेक्षा जास्त रक्कम टाटा चॅरिटी साठी देणगी देतात, जी गरीब लोकांच्या आरोग्य,शिक्षण,ग्रामीण भागातील विकास ,कॅन्सरग्रस्तांसाठी मदत यासाठी उपयोगी येतात..

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी टाटा घरण्याकडून म्हणजेच जमशेदजी टाटा पासून तर रतन टाटांपर्यंत शिकण्यासारखं खूप आहे,विशेषतः रतन टाटा यांच्या कडून काही मूल्ये जी मला महत्वाची वाटतात ती म्हणजे आपल्या एम्प्लॉयी,ग्राहक,शेअरहोल्डर प्रति विश्वास,बांधिलकी,सांघिक कामगिरी,ठाम निर्णय.

रतन टाटा बुद्धिमत्ता, तत्वे,नियम ,जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाची घोडदौड करत एक एक पाऊल पुढे सरकत आहे आणि अशा या तरुणांचा आदर्श असलेला उद्योजक आपल्या कौशल्याने भारत देश घडवण्यात मोठा वाटा उचलतोय…

???? आकाश भुजबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here