रेशन आपल्या दारी!! शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; आता घरपोच रेशन मिळणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील गरीब आणि गरजू जनतेसाठी मोठी खुशखबर आहे. शासन आपल्या दारी या अभियानानंतर आता रेशन आपल्या दारी हा उपक्रम राज्यातील शिंदे फडणवीस सरकार कडून राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांअंतर्गत तुम्हाला रेशन आणण्यासाठी रेशनच्या दुकानात जावं लागणार नाही तर सरकारच घरपोच धान्याचे वाटप करणार आहे. राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.

सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता ज्या नागरिकांना रेशन मिळत त्यांना ते घेण्यासाठी स्वस्तधान्य दुकानात जाण्याची आणि रांगेत उभं राहण्याची गरज नाही. त्याऐवजी आता फिरत्या शिधावाटप वाहनाच्या माध्यमातून या पात्र लाभार्थ्यांना सरकारकडून धान्याचं वितरण करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जनतेचा वेळ वाचणार आहे.

मुंबई आणि ठाण्यापासून या योजनेला सुरुवात होईल. पात्र लाभार्थी सरकारकडून मिळणाऱ्या अन्नधान्यापासून वंचित राहू नये अशा सूचनाही रविंद्र चव्हाण यांनी रेशनिंग अधिकाऱ्यांना दिलेली आहे. मुंबई आणि MMRDA परिसरातील लाभार्थी जनतेला वेळेवर रेशन मिळालं पाहिजे यासाठीच आम्ही ही योजना आणली असून येत्या महिन्यात आम्ही ही योजना कार्यान्वित करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.