Wednesday, February 8, 2023

आपल्या रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या पद्धती

- Advertisement -

नवी दिल्ली । रेशन कार्डच्या (Ration Card) माध्यमातूनच सरकार त्यांच्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. केवळ रेशनकार्डच्या माध्यमातूनच गरीब व्यक्तीना रेशन दिले जाते. अनेक ठिकाणी आयडी प्रूफ म्हणूनही रेशन कार्डचा वापर केला जातो. उदाहरणार्थ नवीन LPG कनेक्शन बनविणे, ड्रायव्हिंग लायसन्स इ. हे पत्त्याचा पुरावा म्हणून देखील मानले जाते. परंतु येथे लक्षात घेण्याचा मुद्दा म्हणजे रेशन कार्ड प्रत्येकाला बनवता येत नाही. हे केवळ एका विशिष्ट उत्पन्नाच्या गटासाठी आहे, ज्यांची मर्यादा राज्य-राज्यात भिन्न असते. याशिवाय तुम्ही रेशनकार्डमध्ये नव्या सदस्याचे नावदेखील जोडू शकता.

जर एखादा नवीन सदस्य आपल्या घरात सामील झाला असेल, जसे की कुटुंबात मूल जन्माला आले असेल किंवा एखादी नवीन सून आली असेल तर आपण तिचे नाव रेशन कार्डमध्ये जोडू शकता, यासाठी आपण ‘या’ सोप्या प्रक्रियेचे पालन केले पाहिजे .

- Advertisement -

येथे माहिती द्यावी लागेल
रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी तुम्हाला आधार कार्डमध्ये सुधारणा करावी लागेल. उदाहरणार्थ, जर एखाद्या मुलीने लग्नानंतर आपले आडनाव बदलले तर तिला तिच्या वडिलांच्या ऐवजी आधार कार्डमध्ये तिच्या पतीचे नाव भरावे लागेल आणि नवीन पत्ता अपडेट करावा लागेल. यानंतर नवीन आधारकार्डचा तपशील पतीच्या क्षेत्रात उपस्थित अन्न विभागाच्या अधिकाऱ्यास द्यावा लागेल.

आपल्याला हवे असल्यास आपण ऑनलाइन व्हेरिफिकेशन नंतरही नवीन सदस्याचे नाव जोडू शकता. यामध्ये जुन्या रेशनकार्डमधील नाव हटवून तुम्हाला नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करावा लागेल. या सर्वांसाठी आपला नंबर नोंदविला जावा. यासाठी, आपल्याला राज्याच्या अन्नपुरवठ्याच्या अधिकृत साइटवर जावे लागेल.

या कागदपत्रांची आवश्यकता असेल

>> मुलाचे नाव जोडण्यासाठी, कुटुंब प्रमुखांचे रेशनकार्ड (फोटोकॉपी आणि ओरिजिनल दोन्ही), मुलाचे जन्म प्रमाणपत्र आणि मुलाच्या दोन्ही पालकांचे आधार कार्ड आवश्यक असेल.

>> सूनेचे नाव जोडण्यासाठी पालकांच्या घरातील रेशन कार्डमधून नाव हटविण्याचे प्रमाणपत्र, मॅरेज सर्टिफिकेट (लग्नाचे प्रमाणपत्र), पतीचे रेशनकार्ड (फोटोकॉपी आणि ओरिजिनल दोन्ही) तसेच महिलेचे आधार कार्डही द्यावे लागेल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group