Monday, January 30, 2023

नाथाभाऊ भाजप संपवणार? तर सून खा. रक्षा खडसे ठाकरे सरकार विरोधात रस्त्यावर उतरणार

- Advertisement -

जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राज्यात भाजपला सुरुंग लावण्याची वल्गना केलीय. तर दुसरीकडे त्यांच्या सुनबाई आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांनी ठाकरे सरकार विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांकडे राज्य सरकार लक्ष देत नसल्याच्या कारणास्तव रक्षा खडसे यांनी येत्या ९ तारखेला आंदोलनाची हाक दिली आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यलयासमोर त्या मोठं आंदोलन करणार आहेत.

भाजपचे सर्व पदाधिकारी आंदोलनात सहभागी होणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी, केळी उत्पादक 2019 या वर्षातील बँकांच्या चुकांमुळे पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत. पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याबाबत कोणत्याही प्रकारची आढावा बैठक घेण्यात आलेली नाही, असा दावा केला जात आहे.  (BJP MP Raksha Khadse)

- Advertisement -

खासदार रक्षा खडसेंचा निर्धार, 9 तारखेला ठाकरे सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार

महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे बोलते, परंतु महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अपयशी ठरली, तरी राज्य शासनाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसाठी जळगाव भाजपतर्फे रक्षा खडसे 9 नोव्हेंबरला आंदोलन करणार आहेत. गेल्या ४ महिन्यांपासून मागणी करुनही राज्य सरकार लक्ष देत नाही. इतर जिल्ह्यातील मंत्री हे त्या ठिकाणी जाऊन पॅकेज घोषित करत आहेत, मग जळगावात का नाही? असा सवाल रक्षा खडसे यांनी उपस्थित केला.  (Eknath Khadse)

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in