रवी राणांनी सपत्नीक बजावला मतदानाचा अधिकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यात मतदानाचा जोर चांगलाच दिसून येत आहे. अपक्ष राहूनही आपण निवडून येऊ शकतो असा दांडगा आत्मविश्वास सोबत असलेल्या राणा परिवाराने आज मतदानाचा अधिकार बजावला. विद्यमान आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत कौर राणा यांनी आज सकाळीच मतदान केंद्रावर हजेरी लावली.

अमरावती म्हटलं की अपक्षांच्या हालचाली जास्त सक्षमपणे स्वीकारणारी जनता हे गणित डोळ्यासमोर येतं. अचलपूरमधून बच्चू कडू तर बडनेरा विधानसभा मतदारसंघातून रवी राणा आपलं नशीब पुन्हा एकदा आजमावत आहेत. अपक्ष राहत सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते यांच्याशी मोट बांधण्याचं काम या दोघांनी मागील अनेक वर्षांपासून केलं आहे. २०१९ च्या निवडणुकीत ही जोडी पुन्हा निवडून येणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Leave a Comment