मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कटप्पासारखा रोल; रवी राणांची घणाघाती टीका

0
89
Ravi Rana Uddhav Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीचे आमदार रवी राणा व नवनीत राणा यांच्याकडून गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही ना काही कारणावरून टीका केली जात आहे. दरम्यान आज रवी राणा यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कटप्पाचा रोल करत आहे. त्यांनी फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला, संभाजीराजेंनाही धोका दिला,” अशी टीका रवी राणा यांनी केली आहे.

रवी राणा यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीकाही केली. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे सुरुवातीला भाजपसोबत होते. त्यांनी भाजपच्या नावावर मते मागितली. त्यानंतर मात्र, फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला. सध्या उद्धव ठाकरे हे कटप्पाचा रोल करत आहे. इतकेच नाही तर त्यांनी संभाजीराजेंनाही धोका दिला आहे. जे छत्रपतींचे झाले नाही ते महाराष्ट्राचे कसे होणार? असा सवाल यावेळी राणा यांनी उपस्थित केला आहे.

रवी राणा यांनी उद्धव ठाकरे याची तुलना बाहुबली या चित्रपटातील कट्टप्पा या पत्राशी केली आहे. आता त्यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेकडून काय उत्तर दिले जाणार? हे पहावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here