एका महिला खासदाराला तुरुंगात टाकणे याला मर्दपणा म्हणत नाही…; रवी राणांची मुख्यमंत्र्यांवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याकडून सध्या या ना त्या कारणांनी निशाणा साधला जात आहे. त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली आहे. “आपल्या हिंदू संस्कृतीवर आलेले संकट, साडेसाती आणि महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यामागचे कारण उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालयापासून महाराष्ट्राची दुर्दशा झाली आहे. उद्धव ठाकरेंची 14 मे रोजी सभा आहे. त्यात ते मर्दासारखं काम करतो वगैरे बोलतील. पण त्यांनी एका महिला खासदाराला तुरुंगात टाकून नामर्दपणाचं काम केले आहे. याला मर्दपणा म्हणत नाही, अशा शब्दात रवी राणा यांनी घणाघाती टीका केली आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांना आव्हानही दिले. यावेळी रवी राणा म्हणाले की, आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. या गुन्हामध्ये १४ दिवस कारागृहामध्ये ठेवले. या कायद्याला स्थगिती दिल्याने सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो. हनुमान चालिसा वाचणाऱ्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे इंग्रजांच्या कायद्याचे पालन करत असतील तर हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे. पण आज सुप्रीम कोर्टाने आज आम्हाला न्याय आणि देशाला दिलासा दिला आहे. त्याबद्दल मोदी सरकारचे आभार मानतो.

बाळासाहेबांच्या शिवसेनेची सुलेमान सेना करुन टाकली

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची दि. 14 मे रोजी सभा होणार आहे. त्यात ते मर्दासारखं काम करतो वगैरे बोलतील. पण त्यांनी एका महिला खासदाराला तुरुंगात टाकून नामर्दपणाचं काम केले आहे. याला मर्दपणा म्हणत नाही. हनुमान चालिसा पठण करणाऱ्यांच्या विरोधात राजद्रोहाचे कलम लावले जाते. हे पाहून बाळासाहेबांना खूप दुःख होत असेल, बाळासाहेबांच्या शिवसेनेची उद्धव ठाकरेंनी सुलेमान सेना करुन टाकली आहे,” अशी टीका रवी राणा यांनी केली.