कसब्याचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकरांनी घेतली गिरीश बापट यांची भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कसबा पेठ पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज भाजपचे जेष्ठ नेते गिरीश बापट यांची भेट घेतली. गिरीश बापट (Girish Bapat) हे गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. तरीही नाकात नळी घालून ते रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात भाजपच्या प्रचारात उतरले होते. मात्र आज धंगेकर यांनी स्वतः गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांच्या तब्ब्येतीची विचारपूस केली आणि आशीर्वादही घेतले. यावेळी गिरीश बापट यांनीही धंगेकर यांना वडीलकीचा सल्ला दिला.

या भेटींनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, गिरीश बापट यांच्याविरोधात मी 2 वेळा निवडणूक लढवली, परंतु ती सुद्धा खेळीमेळीत.. परंतु सध्याच्या सत्ताधारी पक्षाने चुकीच्या पद्धतीने नियोजन करून, हुकूमशाहीची आणि पैशाचे राजकारण केलं. बापट साहेबानी कधी असलं राजकारण केलं नाही. गिरीश बापटांना मी निवडणुकी आधी भेटलो नाही. कारण त्यांच्याविषयी भाजपचा संशय येऊ नये. आता निवडणूक संपली आहे. म्हणून त्यांना आता भेटलो असं धंगेकर म्हणाले.

या भेटीत गिरीश बापट यांनी आपल्याला आशीर्वाद दिले. तू नियोजना प्रमाणे काम करं. तुला काही कमी पडणार नाही, आणि कधीही अडचण आल्यास मला सांग मी मदत करेन असं आश्वासन गिरीश बापट यांनी आपल्याला दिले आहे असं रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं. दरम्यान, धंगेकर यांनी काल मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी जाऊन टिळक कुटुंबीयांची भेट घेतली होती तर आज त्यांनी गिरीश बापट यांची भेट घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाची राजकीय संस्कृती पुन्हा एकदा अधिरोखित झाली आहे.