भारताला मोठा धक्का! ‘हा’ अष्टपैलू खेळाडू Asia Cup मधून बाहेर

Ravindra Jadeja
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दुबई : वृत्तसंस्था – आशिया कप (Asia Cup) स्पर्धेत टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा (Ravindra jadeja) आशिया कप (Asia Cup) स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना मुकणार आहे. दुखापतीमुळे रवींद्र जाडेजा संघाबाहेर गेला आहे. रवींद्र जाडेजाच्या जागी डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात (Asia Cup) जाडेजानं 35 धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर त्यानं हार्दिकसोबत केलेल्या भागीदारीमुळे भारतानं हा सामना 5 विकेट्सनी जिंकला होता.

रवींद्र जाडेजाच्या गुडघ्याला दुखापत
हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यानंतर (Asia Cup) रवींद्र जाडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. सिलेक्शन कमिटीने रवींद्र जाडेजाच्या जागी अक्षर पटेलचा संघात समावेश केला आहे. गुडघ्याला दुखापत झाल्याने जाडेजा संघाबाहेर गेला आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम जडेजावर लक्ष ठेवून आहे.

बीसीसीआयकडून अधिकृत घोषणा
आशिया चषक (Asia Cup) सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाची निवड करताना अक्षर पटेल, श्रेयस अय्यर आणि दीपक चहर या तिघांना स्टँडबाय खेळाडू म्हणून ठेवण्यात आले होते. त्यामुळे जाडेजाच्या जागी अक्षर पटेलला संघात स्थान देण्यात आल्याची अधिकृत घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय