हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागले जात आहे. दरम्यान आज देगलूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवरघणाघाती टीका केली. “आता आगामी निवडणुकीत तीन पक्षाचे अलिबाबा आणि चाळीस चोर मतदान मागण्यासाठी येणार. त्यांनी पीक विम्याचे चार हजार कोटी रुपये वाटून खाल्ले अशी टीका खोत यांनी केली.
देगलूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेले माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पक्षप्रवेशानंतर भाजपचा मेळावाही पार पडला. या मेळाव्यात खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. यावेळी ते म्हणाले,” तीन पक्षाचे अलिबाबा आणि चाळीस चोर मतदान मागण्यासाठी येणार. त्यांनी पीक विम्याचे चार हजार कोटी रुपये वाटून खाल्ले. अतिवृष्टीनंतर आता आम्हाला हे काय देणार? मला खात्री आहे हे काही देणार नाहीत,
काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना खोत म्हणाले की, अशोक चव्हाण हा भाग्यवान माणूस, पण सरपंचाचा शिपाई झाला. मुख्यमंत्री होते पण लाचार होऊन मंत्रिमंडळात मंत्री झाले, अशी टीकाही खोत यांनी यावेळी चव्हाण यांच्यावर केली आहे.