RBI ची ‘या’ बँकेवर कारवाई; 2.20 कोटी रुपयांचा दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI च्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कधी सार्वजनिक क्षेत्रातील बँका, कधी खाजगी बँकाना या ना त्या कारणावरून कारवाई करत असते. आता या कारवाईला अजून एका बँकेला सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) वर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने उत्पन्न निर्धारणाशी संबंधित नियमांचे पालन न केल्या प्रकरणी आणि नियामक अनुपालनातील इतर कमतरतांसाठी 2.20 कोटी रुपयांचा दंड लावत कारवाई केली आहे.

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या तरतुदी नुसार उत्पन्न ओळख, मालमत्तेचे वर्गीकरण आणि ऍडव्हान्सेस संबंधित तरतुदी – NPA खात्यातील फरक ठेवी निर्देशांवरील व्याजदर, 2016 आणि ‘मॅन इन द मिडल अटॅक’ यांचा यामध्ये समावेश होतो. केंद्रीय बँकेने इंडियन ओव्हरसीज बँकेवर केलेली कारवाई ही नियमात्मक अनुपालनातील त्रुटींवर आधारित आहे. परंतु या कारवाईमुळे कोणत्याही ग्राहकाच्या किंवा ग्राहकांनी केलेल्या व्यवहाराच्या वैद्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. असं आरबीआय चे म्हणणे आहे.

31 मार्च 2021 रोजी एवोल्युशन ऑफ बँक 2021 चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये चेन्नई स्थित इंडियन ओव्हरसीज बँक2020-21 साठी ही बँक नफ्याच्या 25 टक्के अनिवार्य रक्कम तिच्या राखीव निधीमध्ये हस्तांतरित करण्यात अयशस्वी ठरली. यामुळे आरबीआय ने केलेल्या तपासानंतर एनपीए मध्येफरक दिसून आला. या कारवाईनंतर भारतीय बँकांनीआरबीआय कडे दाद मागितली. या बँकेने आरबीआय ला अपेक्षित कर्ज तोट्यासाठी नवीन तरतूद लागू करण्यासाठी आणखी वेळ मागवून घेतली आहे.