हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) योजनेच्या सब्सक्रिप्शनसाठी दुसऱ्या टप्प्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या योजनेची दुसरी सिरीज 22 ऑगस्ट रोजी उघडली जाईल. जी 26 ऑगस्ट रोजी बंद होईल. याची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. हे लक्षात घ्या कि, या प्लॅनची पहिली सिरीज या वर्षी 20 जून ते 24 जून दरम्यान सुरू करण्यात आली होती.
सरकार कडून Sovereign Gold Bond मधील गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोने देत नाही तर सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याची संधी दिली जाते. यामध्ये किणत्याही व्यक्तीला एका आर्थिक वर्षात एक ग्रॅम ते चार किलोपर्यंत सोन्याची खरेदी करता येते. गेल्या एका वर्षात सोन्याने गुंतवणूकदारांना 7.37 टक्के नफा दिला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात हा पहिला इश्यू उघडला गेला आहे.
ऑनलाइन खरेदीवर मिळेल 50 रुपये प्रति ग्रॅम सूट
डिजीटल माध्यमातून Sovereign Gold Bond साठी अर्ज करणार्या आणि पेमेंट करणार्या गुंतवणूकदारांसाठी इश्यूची प्राईस 50 रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच 5,041 रुपये प्रति ग्रॅमने कमी होईल. RBI ने सांगितले की,” गुंतवणूकदारांना निश्चित किंमतीवर सहामाही आधारावर वार्षिक 2.5 टक्के व्याज दिले जाईल.”
जास्तीत जास्त 4 किलो पर्यंत बॉण्डच्या खरेदीची मर्यादा
Sovereign Gold Bond योजनेमध्ये कोणत्याही व्यक्तीला एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 4 किलो गोल्ड बॉण्ड्स खरेदी करता येतील. यामध्ये किमान एक ग्रॅमसाठी गुंतवणूक करता येईल. त्याच वेळी, ट्रस्ट किंवा तत्सम संस्थाना 20 किलोपर्यंतचे बॉण्ड्स खरेदी करता येतील.
नोव्हेंबर 2015 मध्ये सॉव्हरेन गोल्ड बाँड योजना सुरू करण्यात आली
सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये Sovereign Gold Bond योजना सुरू केली होती. इथे हे लक्षात घ्या कि, सरकारच्या वतीने RBI कडून हे बॉण्ड्स जारी केले जातात. हे फक्त निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्थांना विकले जाऊ शकतात.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/scripts/NotificationUser.aspx?Id=12340&Mode=0
हे पण वाचा :
Rakesh Jhunjhunwala यांची सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या क्षेत्रात होती ते पहा !!!
Rakesh Jhunjhunwala यांच्या निधनाने आर्थिक जगतात शोककळा !!! अनेक दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली
Central Bank Of India ने FD वरील व्याजदरात केली वाढ, आता किती फायदा होणार ते पहा !!!
Axis Bank कडून FD व्याजदरात बदल; पहा आता किती रिटर्न मिळणार
सुप्रीम कोर्टाच्या वकीलाकडून Aamir Khan विरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल !!!