हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI कडून शुक्रवारी नवी दिल्लीतील रामगढिया सहकारी बँकेवर अनेक आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. ज्यामुळे आता बँकेला प्रति ठेवीदार फक्त 50,000 रुपये काढण्याची मर्यादा निश्चित केली गेली आहे. बँकेची बिघडत चाललेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊनच आरबीआय कडूनहे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र या निर्बंधांसह बँकेच्या संबंधित काम सुरूच राहणार असल्याचेही RBI ने सांगितले.
RBI ने बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, 1949 अंतर्गत सूचना जारी करताना एका निवेदनात म्हटले की,” सहकारी बँकेवर शुक्रवारी कामकाज बंद झाल्यानंतर निर्बंध लागू करण्यात आली आहे. जी पुढील 6 महिने लागू राहतील.
या निर्बंधांनंतर आता RBI च्या बँकेला परवानगीशिवाय कोणालाही कर्ज देता येणार नाही किंवा कर्जाचे रिन्यूअल करता येणार नाही. याशिवाय बँकेमध्ये कोणालाही गुंतवणूक करता येणार नाही किंवा नवीन डिपॉझिट्स स्वीकारता येणार नाही. विशेषतः, सर्व बचत बँक खाती, चालू खाती किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यांमध्ये जमा असलेल्या एकूण रक्कमेपैकी 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही, असेही आरबीआय ने म्हटले आहे.
इथे हे लक्षात घ्या की, डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) च्या इन्शुरन्स योजनेअंतर्गत, बँकांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतच्या डिपॉझिट्सचा इन्शुरन्स काढला जातो. यामुळे, जे बँक दिवाळखोर झाली किंवा तिचे लायसन्स रद्द झाले तर ग्राहकांच्या डिपॉझिट्सची रक्कम गमावण्याचा धोका राहत नाही. DICGC ही RBI ची उपकंपनी आहे जी बँकेच्या डिपॉझिट्सवर इन्शुरन्स कव्हर देते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.dicgc.org.in/
हे पण वाचा :
Indian Overseas Bank चा ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार
आता PAN-Aadhaar Link करण्यास द्यावा लागणार दुप्पट दंड, त्यासाठीची प्रक्रिया तपासा
Home Loan : कोणत्या बँकेकडून कमी व्याजदरात होम लोन दिले जात आहे ते जाणून घ्या
Business Idea : या ‘मसालेदार’ व्यवसायाद्वारे कमवा लाखो रुपये !!!
SBI कडून दरमहा 90 हजार रुपये कमावण्याची संधी, त्यासाठी काय करावे ते जाणून घ्या