हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI कडून नुकतेच महाराष्ट्रातील यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. RBI ने शुक्रवारी याबाबत माहिती देताना सांगितले की,”बँकेकडे पुरेसे भांडवल आणि भविष्यात कमाईची कोणतीही शक्यता नसल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. बँकेने दिलेल्या डेटाचा हवाला देत रिझर्व्ह बँकेने सांगितले की, सुमारे 79 टक्के डिपॉझिटर्सना त्यांच्या डिपॉझिट्सची संपूर्ण रक्कम डिपॉझिट्स अँड क्रेडिट गॅरेंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून मिळवण्याचा अधिकार आहे.” इथे हे लक्षात घ्या कि, DICGC कडून 16 ऑक्टोबर 2022 पर्यंत एकूण विम्याच्या रकमेपैकी 294.64 कोटी रुपये आधीच भरण्यात आले आहेत.
लायसन्स रद्द करण्यामागे काय कारण आहे ???
आता लायसन्स रद्द केल्यामुळे बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडला ‘बँकिंग’चा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. ज्यामुळे आता बँकेला इतर गोष्टींबरोबरच तात्काळ प्रभावाने डिपॉझिट्स घेण्यास आणि ठेवण्यापासून प्रतिबंधित केले गेले आहे.
आता 11 नोव्हेंबर 2022 रोजी (शुक्रवारी) व्यवसाय बंद झाल्यानंतर बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचे लायसन्स रद्द केल्याची घोषणा केली गेली आहे. यानंतर RBI ने म्हटले की,” बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नाही. तसेच बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता बँक आपल्या डिपॉझिटर्सना पूर्ण पैसेही देऊ शकणार नाही. तसेच आता बँकेला बँकिंग व्यवसाय चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास त्याचा सार्वजनिक हितावर विपरित परिणाम होईल.”
याआधीही एका बँकेवर करण्यात आली होती कारवाई
RBI कडून याआधीही महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचे लायसन्स रद्द केले गेले होते. RBI ने महाराष्ट्रातील लक्ष्मी सहकारी बँक लिमिटेडचे लायसन्स रद्द केले होते. तसेच, या बँकेला दिलेल्या सूचनांमध्ये त्यांनी खातेदारांना 5 लाखांपर्यंतची रक्कमही परत करावी, असेही म्हटले गेले आहे.
RBI च्या आदेशानंतर आता लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेला दैनंदिन व्यवहारासहीत अन्य आर्थिक कामे करता येणार नाहीत. आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले गेले की, प्रत्येक डिपॉझिटर्सला DICGC Act, 1961 च्या तरतुदींनुसार DICGC कडून 5 लाख रुपयांपर्यंतचा क्लेम करण्याचा अधिकार असेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/scripts/BS_PressReleaseDisplay.aspx?prid=54162
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा