RBI ने ‘या’ बँकेचा परवाना केला रद्द ! अनेक खातेदारांचे पैसे अडकले, आपणही जमा केलेले नाहीत ना ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सोमवारी उस्मानाबाद, महाराष्ट्रातील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा (Vasantdada Nagari Sahakari Bank) परवाना रद्द केला. रिझर्व्ह बँक म्हणाले की, बँक सध्याच्या ठेवीदारांचे संपूर्ण पैसे सध्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार परत करू शकणार नाही. म्हणूनच त्यांचा परवाना रद्द (License Cancelled) केला जात आहे. या सहकारी बँकेचा परवाना रद्द झाल्यामुळे आणि लिक्विडेशनची प्रक्रिया सुरु झाल्याने वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्याची प्रक्रियाही सुरू केली जाईल, असे केंद्रीय बँकेने म्हटले आहे.

https://t.co/Lusc9kzRY9?amp=1

पाच लाखांपर्यंतची रक्कम सुरक्षित
सोमवारी कामकाज संपल्यानंतर या सहकारी बँकेचा परवाना रद्द झाल्याचे मानले जाईल, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. यानंतर ही सहकारी बँक ऑपरेट करू शकणार नाही. ठेवीदार लिक्विडेशननंतर डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरेंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून पाच लाख रुपयांपर्यंतचे डिपॉझिट मिळण्यास पात्र असेल.

https://t.co/RiNO2msWc3?amp=1

99% पेक्षा जास्त ठेवीदारांना पूर्ण रक्कम मिळेल
रिझर्व्ह बँकेनेही बँकेचे लिक्विडेटर नेमण्याचे आदेश दिले होते. वसंतदादा नागरी सहकारी बँक चालू ठेवणे हे ठेवीदारांच्या हिताचे नाही, असे बँकेचे म्हणणे आहे. सद्य परिस्थितीत बँक आपल्या ठेवीदारांना संपूर्ण पैसे देण्यास सक्षम होणार नाही. सध्या केंद्रीय बँकेने हे स्पष्ट केले आहे की, परवाना रद्द झाल्यानंतरही 99 टक्के ठेवीदारांना त्यांचे भांडवल परत मिळेल.

https://t.co/LH67kaGFPP?amp=1

महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना रद्द झाला होता
RBI ने महाराष्ट्रातील कराडमधील अडचणीत आलेल्या ‘कराड जनता सहकारी बँके’चा परवाना रद्द केला आहे. नोव्हेंबर 2017 पूर्वी रिझर्व्ह बँकेने कराड जनता सहकारी बँकेवर काही निर्बंध घातले होते. परवाना रद्द झाल्यानंतर आता बँक पूर्णपणे बंद होईल, असे आरबीआयने म्हटले आहे.

https://t.co/QSetMkCQKj?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment