हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI FD Rules : रिझर्व्ह बँकेकडून नुकतेच रेपो रेट आणि CRR मध्ये वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे एकीकडे कर्ज महागले आहे तर दुसरीकडे फिक्स्ड डिपॉझिट्स करणाऱ्या गुंतवणूकदारांची दिवाळी झाली आहे. यामागील कारण असे कि, जवळपास सर्वच बँकांनी आपल्या FD वरील व्याजदरात केली आहे.
बँकांनी यावर्षी जानेवारीपासूनच एफडीचे व्याजदर वाढवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. आता मे महिन्यात यामध्ये दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. तसेच, येत्या काही महिन्यांत यामधील व्याजदरात आणखी वाढ होण्याची देखील शक्यता आहे. जर तुम्हांलाही FD करायची असेल तर त्याविषयीच्या काही गोष्टी जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. RBI FD Rules
रिझर्व्ह बँकेकडून नुकतेच FD शी संबंधित नियमांत बदल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांनी FD करण्यापूर्वी या बदललेल्या नियमांची माहिती घेणे आवश्यक असेल, अन्यथा त्यांना नुकसान सहन करावे लागू शकेल. जर आधीच FD केली असेल आणि ती मॅच्युर झाली नसेल, तरी हा नवीन नियम जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. या नवीन नियमानुसार, जर FD च्या मॅच्युरिटीवर रकमेवर क्लेम केला नाही तर तुम्हाला त्यावर कमी व्याज दिले जाईल.
म्हणजेच आता जर FD पूर्ण झाल्यानंतर आपण पैसे काढले नाहीत तर त्या FD वर बँकेकडून दिले जाणारे व्याज मिळणार नाही. त्या FD च्या व्याजदराऐवजी बँक मॅच्युरिटीच्या वेळी बचत खात्यावर जे व्याज देत आहे, तेच व्याज मिळेल. त्यामुळे आता मॅच्युरिटीनंतर लगेच पैसे काढणे चांगले होईल. RBI FD Rules
वास्तविक, याआधी ज्या ग्राहकांनी मॅच्युरिटीनंतर FD मधून पैसे काढलेले नाहीत त्यांना बँकाकडून FD च्या व्याजदरापेक्षा जास्त व्याज मिळते. यामुळे गुंतवणूकदारांनी जास्त व्याज मिळवण्यासाठी मॅच्युरिटीनंतरही पैसे काढले नाहीत. RBI ने आता यावर बंदी घालताना नवा नियम लागू केला आहे. RBI चे हे नवीन नियम सर्व व्यावसायिक बँका, लघु वित्त बँका, सहकारी बँका, स्थानिक प्रादेशिक बँकांमध्ये केलेल्या FD ना सारखेच लागू झाले आहेत. RBI FD Rules
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/Scripts/NotificationUser.aspx?Id=12125&Mode=0
हे पण वाचा :
Banking fraud : बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर बंद झालाय ??? अशा प्रकारे करा अपडेट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, नवीन दर तपासा
Post Office : सरकार ‘या’ छोट्या बचत योजनांवरील व्याजदर वाढवणार ???
Bamboo Farming : सरकारच्या मदतीने ‘हा’ व्यवसाय सुरु करून मिळवा लाखो रुपये !!!
RBI : खुशखबर !!! आता घर दुरुस्त करण्यासाठी देखील मिळणार 10 लाखांपर्यंतचे कर्ज